♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हातभट्टी दारूविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; महिनाभरात १०० गुन्ह्यांची नोंद

MH 28 News Live, बुलडाणा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मे महिन्यात अवैध दारू विरोधात 100 गुन्हे नोंद केले. अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मे महिन्यात आतापर्यंत हातभट्टी दारूविरूद्ध मोहिमेंतर्गत जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीचे 100 गुन्हे नोंदविले आहे. यात 102 आरोपींसह 4 वाहने असा एकूण 1 हजार 226 लिटर हातभट्टी दारू, 38 हजार 302 लिटर मोहा रसायन, 196.92 लिटर देशी दारू आणि 46.44 लिटर विदेशी दारूसह 9 लाख 71 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.


बुलडाणा तालुक्यातील कैकाडी पुरा, भिलवाडा, परदेशीपुरा, पळसखेड नाईक, डोंगरखंडाळा, भादोला, येळगांव, मढ, बोराखेडी, लासुरा, नरवेल, तसेच चिखली कार्यक्षेत्रातील गवळीपुरा चिखली, गवळीपुरा लोणार, चायगाव, खामगाव कार्यक्षेत्रातील देऊळगाव साकर्शा, वाडी शिवार मेहकर, शिराळा, मानेगाव फाटा, आरेगाव कळंम्बेश्वर या परिसरामध्ये मोहिमेंतर्गत अवैध हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीबाबत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

दारुबंदी विभागाचे आवाहन

बनावट मद्य तसेच गावठी हातभट्टी दारूच्या सेवनामुळे जिवीतहानी किंवा गंभीर स्वरुपाचे आजार होण्याची किंवा अन्य दुर्घटना होण्याची दाट शक्यता असल्याने जिल्ह्यातील नागरीकांनी मद्यसेवन परवाना प्राप्त करून केवळ शासनमान्य अबकारी मद्यविक्री परवान्यामधूनच मद्य खरेदी आणि सेवन करावे. तसेच आपल्या परिसरात अवैध मद्यविक्री किंवा बनावट मद्यनिर्मिती होत आढळल्यास टोल फ्री नंबर 18002339999 किंवा व्हॉट्सॲप नंबर 8422001133, किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाच्या पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी. जिल्ह्यातील किरकोळ आणि ठोक मद्य परवानाधारकांच्या परवान्यामध्ये बनावट मद्य आढळून आल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल. तसेच मद्य बाळगताना मद्य सेवन, मद्य वाहतूक करताना अथवा मद्य विक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129