
Good News – प्रतीक्षा संपणार… बुलढाण्यात यंदाच सुरू होणार वैद्यकीय महाविद्यालय; ना. गिरीश महाजन म्हणाले
MH 28 News Live, चिखली : राज्यात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व्हायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यानुसार बुलढाण्यातही वैद्यकीय महाविद्यालय होण्याची घोषणा याआधीच झाली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या वर्षी प्रवेश कसे होतील याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयाला ते जोडल्या जातील. या महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया याच वर्षी सुरुवात होईल आणि बुलढाण्यात लवकर वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल, असे वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज बुलढाण्यात केलं. त्यामुळे अनेक वर्षांपासून जिल्हावसियांची मागणी आता पूर्णत्वास जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आज बुलढाणा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गिरीश महाजन यांनी म्हटले की, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व्हायला पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे. त्यानुसार बुलढाण्यातही वैद्यकीय महाविद्यालय होण्याची घोषणा झालेली आहे. त्यानुसार आता बुलढाण्यात आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. महाजन यांनी पुढे म्हटले की, लवकरात लवकर प्राध्यापकांच्या जागा भरल्या जातील आम्ही पाच हजार जागांच्या जाहिराती काढलेल्या आहेत तसं महाराष्ट्र लोकसेवा आयोगालाही आम्ही सांगितलेला आहे आम्ही जोरदार प्रयत्न करत आहोत आणि लवकरात लवकर त्या जागा भरल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.