
दिल्ली येथे घडलेल्या प्रकरणाचा अभाविपकडून निदर्शनाद्वारे निषेध
MH 28 News Live, चिखली : महीलांवर अत्याचार करणाऱ्या अशा अत्यंत क्रुर अमानवीय घटना सातत्याने घडत आहेत. अशा प्रकारे लव जिहाद सारख्या घटना सातत्याने समोर येत आहे. भारतात प्रत्येक राज्यात असे प्रकरण घडत आहेत. जेव्हा पर्यंत अश्या अपराध्याला फाशी शिक्षा दिली जाणार नाही तेव्हा पर्यंत असे प्रकरण होत राहतील. घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी व साक्षीला त्वरित न्याय देण्यात यावा. यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चिखली शाखेच्या वतीने चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दि. ५ जून रोजी निदर्शन करण्यात आले.

दिल्लीतील शाहबाद डेअरी भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलींची चाकुने भोसकुन व दगडाने ठेचून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या मुलीला त्या नराधमाने तब्बल २१ वेळा चाकुने भोकसले त्यानंतर त्यांने दगडाने तिचे डोके ठेचुन टाकले. जेव्हा साहीलने सदर मुलीवर चाकुने हल्ला करायला सुरुवात केली. त्यावेळी काही तरुण त्या गल्लीत जात होते. मात्र त्या पैकी कोणीही साहीलला अडवण्याचा प्रयत्न सुध्दा केला नाही. तर लोक तेथुन पळवुन जात होती. त्यामुळे लोकांमध्ये काही भावना उरल्या आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या विषयाला वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने हे निदर्शन करण्यात आले.
यावेळी चिखली नगर संघटन मंत्री अभिषेक भेंडे, प्रांत फार्मा व्हिजन सहसंयोजक आदीत्य उन्हाळे, चिखली नगर सहमंत्री अमृता गुप्ता, गौरी चांदणे, कोमल दांदडे, आर्या पहाडे, नुतन झगरे, मानसी चांदणे, प्रेम करवते, अभिषेक मौर्य, दशरथ आटोळे, शुभम जोशी, संदिप जाधव, संकेत सरकटे, शिव गुजर, विठ्ठल गोल्लार, अभिषेक हके, तरुण येवले, अनिकेत पाटील, आदित्य बोरुळ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



