
लोणार तालुका वकिल संघाची कार्यकारणी जाहीर. अध्यक्षपदी ॲड. दिपक पुंजाजी मापारी यांची निवड
MH 28 News Live, लोणार : तालुका वकिल संघाची सन २०२३ – २४ या वर्षाची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी ॲड. दिपक पुंजाजी मापारी, उपाध्यक्षपदी ॲड. शिवशंकर संभाजी आघाव, सचिवपदी ॲड. सुधाकर अर्जुनराव अवचार, सहसचिवपदी ॲड. अशोक अवसरमोल, कोषाध्यक्षपदी ॲड. फौजीया अली या नविन संचालक मंडळाची निवड करण्यात आली.

माजी अध्यक्ष ॲड. प्रफुल्ल जायभाये यांनी दि. १३ जून रोजी नवनिर्वाचीत अध्यक्ष ॲड. दिपक पुंजाजी मापारी यांच्याकडे कार्यभार सोपवला. यावेळी माजी सचिव ॲड. रणजीत डव्हळे , माजी उपाध्यक्ष ॲड. ऋषीकेश डहाळके, जेष्ठ विधीतज्ञ ॲड. हाडे, ॲड. सदाशिव मुंढे, ॲड. शिवाजी सानप, ॲड. विठ्ठल तनपुरे, ॲड. सुजीत मोरे, ॲड. भीमराव अंभोरे, ॲड.शुभम पालवे तसेच इतर सदस्य हजर होते. दरम्यान ॲड. शिवाजी सानप यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यकामाचे आभार प्रदर्शन ॲड. विठ्ठल तनपुरे यांनी केले. तर सुत्रसंचालन ॲड. शुभम पालवे यांनी केले. यावेळी नवीन कार्यकारणीला शुभेच्छा देण्यात आल्या.



