अध्यात्म शिक्षण शिबीर समारोप तथा भुमिशुद्धी कार्यक्रम संपन्न
MH 28 News Live, उदयनगर : येथून जवळच असलेल्या श्री तीर्थंकर महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर, डासाळा येथे सुरू असलेल्या आध्यात्मिक शिक्षण शिबीराचा दि. १८ जूनला रोज समारोप झाला. हया शिबीरासाठी आध्यात्मिक गुरू पं. श्री. दिनेशभाई शहा, मुंबई तसेच गुरुमाता विदुषी डॉ सौ. उज्ज्वला दि. शहा मुंबई यांचे मंगल सानिध्य लाभले. शिबीरासाठी संपुर्ण भारतामधील विविध भागांमधून एकुण ११० शिबीरार्थीनी लाभ घेतला. शिबीरात तत्वज्ञान आध्यात्मिक बोध, माझे स्वरूप व खऱ्या शाश्वत सुखाची प्राप्ती याची प्रचिती सर्वांना आली. दि. १८ जून रोजी स्व. भव्यचंद्र मो. बेलोकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ डासाळा येथील प्रगतीशिल कारतगार देवेंद्र भ· बेलोकर, सौ. माया दे. बेलोकर, जितेंद्र दे. बेलोकर, सौ रुपाली जि. बेलोकर या परिवाराने भव्य अध्यात्म संकुल साठी जागा दान दिली. या जागेवर तसेच जोडुन असलेल्या मंदिराच्या जागेवर भुमिशुद्धीचा कार्यक्रम संपन्न झाला.
सर्वप्रथम सकाळी भव्य दिव्य मंगल कलश शोभायात्रा काढण्यात आली डॉ.सौ. उज्वला शहा, दिनेशभाई शहा तसेच सर्व पाहुणे मंडळी यांच्या हस्ते विधीवत मंगल शुद्धी करण्यात आली. सुमेरचंद बेलोकर, शांतीलाल मेहता मुंबई आदिनाथ स्वामी दर ५० मी श. महेंद्र बेलोकर, जितेंद्र बेलोकर रिसोड, सुभाष अजमेरा अकोला, विजय लिलाचंदनी जैन नांदुरा, दिलीप कुमार बेलोकर मुंबई, विजयकुमार बेलोकर, राजेंद्र नाके, प्रेमचंद नाके डासाळा, किशोर बोथरा वाडेगांव, प्रदीप बेगाणी, ललीत कोठारी, सुजीत चौरडीया बुलडाणा, ग्रामपंचायत डासाळाचे सदस्यगण तसेच सरपंच विजय मोरखडे तथा पोलीस पाटील संदीप युमकर हे मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण भुमिशुद्धी विधी, विधान पं. श्री सुनीलकुमार नाके निम्बाहेडा (राज.) यांनी केले. शिबीर व कार्यक्रमासाठी वरुड बु., चिखली, देराना, धभपती, संभाजी नगर, बुलढाणा, खामगांव, अकोला, बोरी अरब, दुसरबीड, रिसोड, वाशिम, देवळाली, नाशिक, मुंबई, शेलूद, नांदुरा, वाडेगांव, डोणगांव, पुणे व डासाळा गावांच्या साधर्मी बांधवांनी लाभ घेतला.
रात्रीच्या सन्मान सोहळ्यात पं. दिनेशभाई शहा व डॉ. सौ. उज्ज्वला शहा यांनी देश विदेशात अध्यात्म गंगा प्रवाहीत केली. जिनवाणीचा, जैन तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार केला त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या बांधवांनी आध्यात्मिक लाभ घेतला या कार्याची दखल घेऊन सांचा, तीर्थकर आदिनाथ स्वामी दि. जैन मंदिर चिखली व त्यांचे अंतर्गत श्री. तीर्थकर महावीर स्वामी दि. जैन मंदिर डासाळा व सकल जैन समाजाच्या वतीने त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंतकुमार बेलोकर, आभारप्रदर्शन सुमेरचंद बेलोकर तसेच संचलन रस्टचे सचीव सतीश बेलोकर यांनी केले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button