
आ. डॉ.संजय रायमूलकर यांच्या प्रयत्नाने लोणार तालुक्यासाठी चार कोटीचा विकास निधी मंजूर
MH 28 News Live, लोणार : लोणार तालुक्यासाठी विविध कामाचा प्रश्न आमदार डॉ.संजय रायमुलकर यांनी विधानसभेत लावून धरला व खासदार प्रतापराव जाधव यांनी वेळोवेळी पाठवुरावा केला. त्याच्या प्रयत्नाने लोणार तालुक्यात विविध योजनेअंतर्गत ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आज स्थानिक विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी यांनी दिली. यामध्ये अल्पसंख्याक बहुल ग्रामीण योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील ८६ लक्ष रुपये निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत १ कोटी ५१ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांदन रस्ते योजनेअंतर्गत तालुक्यातील ११.५० कि.मी. रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. यासाठी १ कोटी ५१ लक्ष रूपये निधी मंजूर करण्यात आले. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत ४० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
लोणार शहरातील जैन मंदिर ते जामा मस्जीद चौकापर्यंत नाली बांधकाम व सिमेंट रस्तासाठी ७१ लक्ष रुपये, प्रभाग क्रमांक ५ मध्ये शादीखान्यासाठी ५० लक्ष, नगर परिषद घरकुल येथे रस्ता बांधकामासाठी ४८ लाख रुपये निधी मिळाला असून उर्वरित निधी मंजूर झालेल्या योजनेअंतर्गत तालूक्यातील विविध ठिकाणी खर्च होणार आहे. यामध्ये रस्ते, समाज मंदिर, कब्रस्तान संरक्षण भिंत, स्मशानभूमी सुशोभिकरण अशी विविध विकास कामे करण्यात येणार असल्याचे माहीती प्रा. बळीराम मापारी यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक डाॅ. अनिल मापारी, सरपंच गजानन मापारी, माजी सरपंच संजय घायाळ, पंचायत समिती विभाग प्रमुख विठ्ठल घायाळ उपस्थित होते.
मुस्लिम शादीखान्यासाठी ५० लक्ष रुपये मंजूर
लोणार शहरातील मुस्लिम शादीखान्याचा जिव्हाळ्याप्रश्न मागील पंधरा वीस वर्षापासून विविध कारणांमुळे प्रलंबित होता. एकदा आलेला निधी परत गेला होता आज खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नाने नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर ५० लक्ष रूपयांचा शादीखाना उभारण्यास येणार असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली. यामुळे मुस्लिम समाजाचा बर्याच वर्षापासून असलेला शादीखान्याचा प्रश्न सुटणार आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button