
‘ त्या ‘ खून प्रकरणातील आरोपीस १४ जुलै पर्यंत पोलीस कोठडी
MH 28 News Live, लोणार (राहुल सरदार) : जुन्या भांडणाचा राग मनात ठेवत तीन जणांनी एका युवकाला मारहाण करत त्याच्या पोटात चाकू भोकसून खून केल्याची घटना ९ जुलैचे रात्री घडली होती. या घटनेतील आरोपी शुभम उर्फ विशाल भारस्कर.शुभम नारायण मापारी उदय विनोद सातपुते यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना ११ जुलै ला न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मृतक रितेश सुनील मापारी हा लोणार येथील तेजस वाईन बार व रेस्टॉरंट येथे जेवना करता गेला असता.आरोपी शुभम नारायण मापारी उदय विनोद सातपुते व शुभम उर्फ विशाल भारस्कर यांनी मृतकासोबत जुन्या भांडणाचा वाद उकरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली यावेळी मृतक रितेश सुनील मापारी याने विनाकारण शिवीगाळ करू नको असे मात्र तिने आरोपींनी मृतकास लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली व त्याचे दोन्ही हात पकडून ठेवले यावेळी आरोपी शुभम उर्फ विशाल भारस्कर यांनी त्याच्या हातातील चाकूने मृतक रितेश मापारी यांच्या पोटात वार केला होता. उपचारादरम्यान रितेश मापारी याला अकोला येथे डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शनातं लोणार पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार निमीष मेहेत्रे लेखणीक गजानन सानप विशाल धोंडगे करीत आहेत.