♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शेतकऱ्याने जिल्हा कृषी अधीक्षकाच्या दालनात ओतले अंगावर डिझेल

बुलडाणा – एका शेतकऱ्याने बुलडाणा शहरातील जिल्हा कृषी अधीक्षकाच्या दालनात अंगावर डिझेल यातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. मात्र उपस्थितांनी त्याला तात्काळ धरल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना आज 27 जुलै रोजी सायंकाळी घडली.

प्राप्त माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील शंकर श्यामराव देशमुख यांनी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय यांना निवेदन दिले होते. निवेदनामध्ये नमूद आहे की, आपल्या तीन एकर शेतामध्ये कपाशीची लागवड केली होती.

मात्र किडीने कपाशीवर आक्रमण केल्याने पिकाची वाढ खुंटली. यासंदर्भात जिल्हा कृषी अधिक्षकाकडे तक्रारी केली होती. त्यानुसार कृषी विभागाच्या पथकाने पंचनामा केला. पथकाने केलेल्या पंचनाम्यात पन्नास टक्के झाडांची वाढ चांगली दिसून आली तर उर्वरित पन्नास टक्के झाडांची वाढ फुटलेली दर्शविण्यात आली.

मात्र पेरण्यात आलेली कपाशीची बियाणे ही शंभर टक्के खराब निघाल्याने सदर पंचनामा हा चुकीचा झाला. असल्याचा आरोप करून शेतकरी शंकर देशमुख हे आज कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात आले त्यानंतर त्यांनी सर्वांच्या नजरा चुकून दालनामध्ये अंगावर डिझेल घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीचे शेतकऱ्यांच्या समस्या कडे कायम दुर्लक्ष होत असून ही बाब अत्यंत शरमेची आहे. शेतकऱ्याच्या समस्येसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी उपस्थित मनसेचे बुलडाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे यांनी दिला.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129