नसती उठाठेव… सोशल मीडियावर फेक सर्वेची पोस्ट, कैलास जंगले विरोधात चिखलीत तक्रार दाखल; न्यूज 18 लोकमतही करणार कारवाई
MH 28 News Live चिखली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखली मतदारसंघाचा सर्वे करण्यात आला असून या सर्वेमध्ये माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना ८०.१२ टक्के लोकांनी पसंती दर्शवल्याची एक पोस्ट येथील कैलास जंगले या तरुणाने सोशल मीडियावर व्हायरल केली होती. न्यूज 18 लोकमत या मराठी वृत्तवाहिनीचे पूर्वीचे नाव व बोधचिन्ह वापरुन ही पोस्ट फेसबुक, व्हाट्सअप आदी सोशल मीडिया साईट्सवर प्रसारित करण्यात आली होती. या खोडसाळपणाची तीव्र प्रतिक्रिया चिखली शहरांमध्ये उमटली असून चिखली पोलिसांकडे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याशिवाय आयबीएन न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीने देखील आपण सदर व्यक्तीवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, स्थानिक कैलास जंगले या युवकाने न्यूज 18 लोकमत या मराठी वृत्तवाहिनीचे पूर्वीचे नाव ( IBN लोकमत) व लोगो वापरून एक पोस्ट तयार केली. या पोस्टमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांना चिखली मतदारसंघातून ८०. १२ टक्के मतदारांनी पहिली पसंती दर्शवल्याचे भासवण्यात आले. सोशल मीडियावर या बद्दल अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असल्याचे गेल्या दोन दिवसात पाहायला मिळाले आहे.
पोलीस तक्रार दाखल, न्यूज एटीन लोकमत ही करणार कारवाई
कैलास जंगले याने अशा प्रकारची भ्रामक पोस्ट तयार करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याच्या कारणावरून चिखली पोलीस ठाण्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सोशल मीडिया समन्वयक विजय खरे यांनी तक्रार दाखल केली आहे व या तक्रारीमध्ये कैलास जंगले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय न्यूज 18 लोकमत या मराठी वृत्तवाहिनीने देखील आपण कैलास जंगले विरोधात लवकरच कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button