♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बालविवाहाचा प्रकार उघडकीस; नवरदेवासह सहा जणांविरुद्ध चिखली पोलीसात गुन्हा दाखल

MH 28 News Live / चिखली : आपल्या मोठ्या मुलीच्या अपहरणाचा गुंता सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वडिलांच्या धाकट्या अल्पवयीन मुलीचा विवाह स्वत : च्या मुलाशी लावून देण्याचा प्रकार चिखली तालुक्यातील किनोळा येथे उघडकीस आला. परिस्थितीचा गैरफायदा घेऊन हा बालविवाह करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपीविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सदर घटने संदर्भात थोडक्यात माहिती अशी की, याप्रकरणातील आरोपी नवरदेव डोंगरखंडाळा येथील राहणारा आहे. नवरदेवासह ६ जणांविरुद्ध चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वैभव एकनाथ सावळे असे गुन्हा दाखल झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. याशिवाय नवरदेवाचे वडील एकनाथ नागोराव सावळे, आई कुसुमबाई, किन्होळा येथील पूजा बाहेकर, पूजा बाहेकर यांचे पती आणि पूजा बाहेकर यांची सासू अशा ६ जणांविरुद्ध पीडित मुलीने तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार पीडित मुलीच्या मोठ्धा बहिणीचे मोताळा तालुक्यातील काबारखेड येथील गोपाल अशोक सोनवणे याने मागील महिन्यात अपहरण केलेले आहे. त्याच्याविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. ही बाब मुलीच्या वडिलांनी नातेवाईक असलेल्या डोंगरखंडाळा येथील एकनाथ सावळे यांना सांगितली. तुम्हाला माझ्या मुली बद्दल काही माहिती आहे का अशी विचारणा केली यावर एकनाथ सावळे यांनी तुमच्या लहान मुलीचे माझ्या मुलासोबत लग्न लावून द्या तुमची मोठी मुलगी मी आणून देतो असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून मुलीच्या वडिलांनी लग्नाला होकार दिला. मुलीसह तिच्या नातेवाईकांचा देखील या लग्नाला विरोध होता.. दरम्यान २३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता किन्होळा येथे हे लग्न लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत चाइल्ड लाईनला गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानंतर प्रशासनाने त्यावर तात्काळ हस्तक्षेप करून कारवाई केली आहे. पीडित मुलीला बुलढाणा येथील सखी वन स्टॉप सेंटर येथे ठेवण्यात आलेले असून चिखली पोलीस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129