
रेल्वेखाली येऊन नांदुर्याजवळ ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
MH 28 News Live, नांदुरा : मुंबई- नागपूर लोहमार्गावरील बिस्वा ब्रिज रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वे गाडीखाली येऊन ५० वर्षीय व्यक्ती ठार झाला. ही घटना आज, २४ मार्चला घडली.
मरण पावलेल्या व्यक्तीची आेळख अद्याप पटली नसून, उंची साडेपाच फूट, रंग सावळा, शरीर बांधा मजबूत, डोक्याचे केस पांढरे, अंगात निळे शर्ट, काळी फुलपँट, काळी अंडरवेअर असे त्याचे वर्णन आहे. मृतदेह ओळख पटविण्यासाठी मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी शेगाव रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतकाला कोणी ओळखत असेल किंवा कुणाकडे काही माहिती असेल तर शेगाव रेल्वे पोलीस ठाण्याच्या पो.ना. राम मोहेकार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.