
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा
MH 28 News Live, चिखली : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय चिखली केंद्राच्या वतीने दि. 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या निमित्त विविध कार्यक्रमांसह रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभर सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय चिखली केंद्राच्या वतीने देखील दि. 14 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांद्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. MH 28 News Live चे मुख्य संपादक रेणुकादास मुळे, चिखली मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ रवींद्र कमळस्कर, डॉ चेतन समदानी तसेच कारगिल युद्धामध्ये सहभागी झालेले माजी सैनिक वासुदेव जाधव यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रध्वज तिरंगा झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण देखील करण्यात आले होते. आपल्या प्रास्ताविकातून केंद्राच्या प्रमुख सुरेखादीदी यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. रेणुकादास मुळे, डॉ. रवींद्र कमळकर, डॉ. चेतन समदानी व वासुदेव जाधव यांनी आपल्या भाषणांमधून उपस्थितांना स्वातंत्र्य 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या व आपले विचार व्यक्त केले. माजी नगराध्यक्षा शोभाताई सवडदकर, डॉ. अंजली कमळस्कर यांच्यासह या कार्यक्रमास ब्रह्मकुमारीच्या सर्व साधक, साधिका व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शहरातून तिरंगा रॅली काढून या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सर्व साधकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.



