♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

यूकेमध्ये भारतीय वंशाच्या खासदार शिवानी राजा यांनी हातात भगवद्गीता घेऊन घेतली शपथ

MH 28 News Live : युक्रेनमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत मजूर पक्षाचा मोठा विजय झाला आहे. मजूर पक्षाने जवळपास ४०० पेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ हुजूर पक्षाचा (कॉन्झर्व्हेटिव्ह) दारुण पराभव झाला. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना या पराभवानंतर पंतप्रधानपद सोडावे लागले, तर मजूर पक्षाचे (लेबर पार्टी) नेते कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली.

या निवडणुकीत भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी यूकेमधील लीसेस्टर पूर्वमधून मोठा विजय मिळवत त्या खासदार झाल्या आहेत. शिवानी राजा यांनी मंगळवारी खासदारकीची शपथ घेतली. त्यांचा हा शपथ घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचं कारण म्हणजे शिवानी राजा यांनी खासदार म्हणून शपथ घेत असताना त्यांच्या हातात भगवद्गीता होती.

यूकेमधील लीसेस्टर पूर्व हा मजूर पक्षाचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र, भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी येथून विजय मिळवला. दरम्यान, शिवानी राजा यांनी खासदारकीची शपथ घेतानाचा एक व्हिडीओ एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, “लीसेस्टर पूर्वचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आज संसदेत शपथ घेणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. तसेच शपथ घेताना मला अभिमान वाटला.”

दरम्यान, शिवानी राजा यांनी १४ हजार ५२६ मते मिळवत त्यांच्या विरोधी उमेदवाराचा ४ हजार ४२६ मतांनी पराभव केला. यूकेमध्ये ६५० जागांवर निवडणूक झाली. या निवडणुकीत मजूर पक्षाने ४१२ जागा जिंकल्या आहेत. तर ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा (कॉन्झर्व्हेटिव्ह) पक्षाला फक्त १२१ जागा जिंकता आल्या आहेत. खासदार शिवानी राजा यांची आई राजकोटच्या आहेत तर वडील गुजराती आहेत. शिवानी राजा यांचा जन्म लीसेस्टरमध्ये झालेला आहे

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129