♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

फसवण्याची नवी शक्कल, लुबाडण्याचा नवा फंडा… शेअर मार्केटच्या नावाखाली घालत होता लोकांना गंडा ! बुलढाण्याच्या व्यक्तीची १० लाखांनी फसवणूक करणाऱ्या गुजरातातील तोतया शेअर ब्रोकरच्या आवळल्या सायबर पोलिसांनी मुसक्या

MH 28 News Live / बुलढाणा : एका व्यक्तीची शेअर मार्केटच्या नावाखाली १० लाखांनी फसवणूक करणाऱ्या आरोपीस बुलढाणा सायबर पोलिसांना गुजरात राज्यातील वडनगरमधून दि. १३ जुलै रोजी अटक केली.

शहरालगत असलेल्या सुंदरखेडचे रहिवासी अभिजीत अनिल जाधव (३९) यांची शेअर मार्केटच्या नावाखाली १० लाख २० हजार रुपयांची फसवणूक झाली होती. यासंदर्भात त्यांनी २४ फेब्रुवारी २०२४ रोजी बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तेव्हापासून तपास सुरू होता. मात्र यश मिळत नव्हते. अखेर पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या शोध घेतला असता आरोपीचे लोकेशन गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यातील वडनगर निघाले.

जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे प्रमुख प्रकाश सदगीर, पोलीस कर्मचारी शकील खान, रामू मुंडे, राजदीप वानखेडे, क्षितिज तायडे व विकी खरात यांनी वडनगर गाठले. वडनगर पोलिसांच्या मदतीने आरोपी अनिलजी अर्जुनजी ठाकूर याला अटक करून १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बुलढाण्यात आणण्यात आले. या आरोपीवर हैदराबादसह अन्य काही ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129