♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

उद्धव साहेबांनी आता तरी जुन्या निष्ठावंतांना न्याय द्यावा ! डॉ. शिवप्रसाद गोंधणे यांची शिवसेना उबाठा पक्षाकडे मेहकर मधून तिकिटाची मागणी

MH  28 News Live / चिखली : मेहकर मतदारसंघातून जिल्हातील एकमेव ज्येष्ठ शिवसैनिक शिवसेनेचे संस्थापक सदस्य शिलेदार डॉ. शिवप्रसाद गोंधणे यांनी मुंबई येथील शिवसेना भवन येथे शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे.

पक्षाच्या प्रत्येक लढ्यामध्ये डॉ. शिवप्रसाद गोंधळे हे गेल्या ३८ वषर्षापासून सक्रिय आहेत. आजपर्यंत कोणतेही पद न घेता फक्त संघटना वाढवण्याचे काम त्यांनी एकनिष्ठेने व इमानदारीने केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जिल्ह्यात अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने डॉ. गोंधणे यांनी जिल्हातील सर्वात मोठे मेळावे स्वखर्चाने घेऊन संघटन कार्यात आपला सक्रिय सहभाग आजवर नोंदवला आहे. याशिवाय सुरवातीपासून खेड्या खेड्यात व शहरात शाखा स्थापन केल्या.

यावेळी अवश्य विचार व्हावा !

२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. शिवप्रसाद गोंधणे यांनी तेव्हा प्रथमच राखीव झालेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाकडे तिकिटाची मागणी केली होती. याव्यतिरिक्त अनेक वेळा इतर ठिकाणी देखील त्यांनी उमेदवारी मागीतली. परतु, डॉ. गोंधणे त्यांना अद्याप एकदाही तिकीट मिळाले नाही. मात्र तरीही बंडखोरी न करता प्रत्येक वेळी त्यांनी पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे तन-मन धन पूर्वक काम करुन विजयी केले. त्यामुळे या निवडणुकीत तरी डॉक्टर गोंधणे यांच्या नावाचा विचार शिवसेना उबाठा पक्षाने अवश्य करावा व उमेदवारी देऊन त्यांना एकवार लढण्याची संधी बहाल करावी अशी मागणी होत आहे.

रुग्णसेवेत डॉ. गोंधणे यांचे मोठे योगदान

राजकारणाव्यतिरिक्त सुध्दा डॉ. शिवप्रसाद गोंधणे यांचे सामाजिक व रुग्णसेवेचे कार्य देखील उल्लेखनीय आहे. डॉ. गोधणे हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चर्मरोग चिकित्सक आहेत. मेहकरसह संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्याकडून आजवर अनेकदा मोफत गोळ्या, इंजेक्शन, लोशन आदी औषधांचे मोफत वितरण सर्व जाती-धर्मांच्या गरीब व गरजू रुग्णांना केले जाते. त्यामुळे गोरगरीब वर्गात डॉ. गोंधणे यांच्या बद्दल मोठी सहानुभूती व लोकप्रियता पाहायला मिळते. याचा फायदा त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये निश्चितच होऊ शकतो तसा विश्वास डॉ. गोंधणे यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. त्यांचे हे कार्य पाहता या विधानसभा निवडणुकीत मेहकर मतदारसंघातून एकमेव जिल्ह्यातील एकमेव निष्ठावंत शिवसैनिक डॉ. शिवप्रसाद गोंधणे यांना शिवसेना उभाठा पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी त्यांचे समर्थक कार्यकर्ते करत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129