ब्रेन ट्यूमरने ग्रस्त चिमुकल्या अक्षताची ऐकली श्वेताताईंनी हाक; लीलावती रुग्णालयात केली मोफत उपचाराची व्यवस्था
MH 28 News Live / चिखली : जगातील कोणत्याही भावानेपेक्षा श्रेष्ठ असलेल्या माणुसकीच्या ओलाव्याला जपणाऱ्या नेत्या म्हणजे आ. श्वेताताई महाले होत याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. चिखली तालुक्यातील वैरागड येथील गरीब कुटुंबातील चार वर्षाच्या अक्षता नामक चिमुकल्या मुलीला ब्रेन ट्यूमर या दुर्धर आजारावरील उपचारासाठी मुंबई येथील सुप्रसिद्ध असलेल्या लीलावती रुग्णालयात मोफत उपचाराची व्यवस्था करत आ. श्वेताताई महाले यांनी पुन्हा एकदा आपली संवेदनशीलता दाखवून दिली आहे असेच म्हणावे लागेल.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, तालुक्यातील वैरागड येथील विठ्ठल टापरे यांची चार वर्षाची मुलगी अक्षता हिला ब्रेन ट्यूमरचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, टापरे कुटुंबियाची परिस्थिती अतिशय सर्वसाधारण असल्यामुळे या आजारावरील महागडे औषधोपचार करणे ही त्यांच्या आवाक्याबाहेरील बाब होती. त्यामुळे, परिस्थिती समोर त्यांनी हात टेकले व निराश झाले. परंतु, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गजानन रसाळ आणि भाजपचे बूथ प्रमुख शिवाजी साठे यांनी त्यांना धीर दिला व अक्षता हिच्या आजाराबद्दलची माहिती आ. श्वेताताई महाले यांच्या कानी घातली. गोरगरिबांच्या मदतीसाठी नेहमीच धावून जाणाऱ्या आणि विशेषतः आरोग्य सेवेच्या बाबतीत सदैव संवेदनशील व तत्पर असलेल्या श्वेताताई महाले यांनी क्षणाचाही विलंब न लावता अक्षता हिच्या उपचारासाठी पुढील पावले उचलली. श्वेताताईंच्या मदतीने अक्षता टापरे हिला मुंबई येथील सुप्रसिद्ध अशा लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रोग निदान यशस्वीपणे पार पडल्यानंतर तिच्या नि : शुल्क उपचाराची व्यवस्था त्यांनी करून दिली.
श्वेताताईंची दिसून आली संवेदनशीलता
राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा घेतलेल्या कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील नेत्या असलेल्या आमदार श्वेताताई महाले यांची संवेदनशीलता या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली. आजवर श्वेताताई महाले यांनी मुख्यमंत्री सहायता निधी, सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा कॅन्सर मेमोरियल ट्रस्ट आदी विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून चिखली मतदारसंघातील गोरगरीब जनतेच्या आरोग्य उपचारासाठी भरीव सहकार्य केले आहे. या मानवतेच्या कार्यातून श्वेताताईंनी गोरगरिबांचे अमूल्य असे आशीर्वाद मिळवले असून ही पुण्याई निश्चितच त्यांच्या राजकीय वाटचालीस फलदायी ठरेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button