
भगवानबाबा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न
MH 28 News Live, सिंदखेड राजा : माऊली शिक्षण प्रसारक संस्था कि. राजा द्वारा संचालित संत भगवान बाबा कला महाविद्यालय सिंदखेडराजा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा. योगाभ्यासाने तंदुरुस्त आणि निरोगी आयुष्य जगता येते, निरोगी आयुष्याकडे वाटचाल करण्यासाठी, स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी नियमित योग, प्राणायाम करणे गरजेचे आहे याच उद्देशाने संत भगवान बाबा कला महाविद्यालय सिंदखेडराजा येथे राष्ट्रीय सेवा योजना आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने दि. २१ जून रोजी सकाळी जागतिक योग दिवसाचे आयोजन करण्यात आले.
सुरवातीला ध्यानाच्या स्थितीत बसून हाताची नमस्कार मुद्रा करून प्रार्थना केली. त्यानंतर महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ गणेश दराडे सदस्य योग भूमी परिवार, जालना यांनी शिबीरातील सहभागींना योग आहे, आरोग्यासाठी लाभकारी योग आहे मुक्त जीवनासाठी गुणकारी. याप्रकारे योग साधनेच महत्त्व विशद करून, विविध योगासन आणि प्राणायाम करुन घेतली. यावेळी सावित्रीबाई फुले विज्ञान महाविद्यालय, रामकृष्ण वायाल महाविद्यालय तसेच उत्कर्ष महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुद्धा उस्फूर्त पणे सहभाग नोंदविला . आम्हाला आमच्या मनाला नेहमी संतुलित ठेवायचे आहे. याच्यातच आमचा आत्म विकास सामावला आहे असा संकल्प करुन शांती पाठाने सांगता करण्यात आली. यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सत्यनारायण नागरे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रिया बोचे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अविनाश खरात यांनी परिश्रम घेतले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किशोर वळसे व सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button