♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मनसेच्या बंडू बरबडेच्या प्रचाराचा धाड सर्कल मध्ये झंझावाती दौरा ; बदल घडवण्यासाठी एकमताने पुढे येण्याची गरज

MH 28 News Live / चिखली : भ्रष्टाचार मुक्त चिखलीसाठी एकमताने पुढे येण्याची आज काळाची गरज आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातील गुंडगिरीचा धुडगूस, एकाधिकारशाही संपवण्याची हीच योग्य वेळ आली आहे. प्रचारादरम्यान बरबडे यांनी संपूर्ण मतदारसंघातील विविध गावांमध्ये भेटी दिल्या. यावेळी जनसामान्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता गणेश उर्फ बंडू बरबडे यांच्या प्रचाराचा झंझावात निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

चिखली विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश ऊर्फ बंडू श्रीराम बरबडे यांना गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत आहे. रॅली, सभा, बैठकांना गर्दी होत असून यंदा परिवर्तन करायचेच, अशा भावना जनसामान्य आहे. ९ नोव्हेंबर रोजी धाड, चांडोळ, सातगाव मसाला परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश उर्फ बंडू बरबडे प्रचारार्थ प्रत्येक गावातील नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला. महामानवांना अभिवादन करुन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेत बरबडे यांनी सर्वांशी संवाद साधला. यावेळी मनसेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील असंख्य नागरिकांची उपस्थिती होती. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपणास गुंडशाही आणि दडपशाहीला पराभूत करायचे आहे. भयमुक्त तसेच भ्रष्टाचारमुक्त मतदारसंघ आपल्याला करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. कुण्या एकट्याने हे काम होणार नाही. एकजुटीची ताकद काय असते हे आपल्याला दाखवून द्यायचे आहे. परिवर्तनाच्या लढाईसाठी सर्जजण सज्ज व्हा, असे आवाहन बरबडे यांनी केले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129