♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

महाराष्ट्र – मध्य प्रदेश सीमेवर होत सुरू आहे गायींची तस्करी बजरंगीकडून ४७ गोवंशांना जीवदान, ११ आरोपींना अटक

MH 28 News Live / संग्रामपूर : महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेवर सातपुडा पर्वत आहे. या पर्वतिय क्षेत्रातून जळगाव जामोदवरून पास होतांना इथे २ चौक्या आहे १ वन विभाग तर दुसरी पोलीस स्टेशनची तरी सुध्या गुराढोरांची , दिवसा ढवळ्या ही तस्करी सुरू आहे ह्यात कूठे तरी “दाल मे कूछ काला” तो नहीं अशी नागरिकात चर्चा आहे त्यामुळे ही तस्करी रोखण्यासाठी बजरंगदल संग्रामपूर प्रखंडाच्या बजरंगीनी पाळत ठेवून ४७ गोवंशांना जीवदान दिले.शनिवार ७ डिसेंबरच्या पहाटे ५ वाजेदरम्यान,सोनाळा पिंगळी जून्या रस्तावरच्या भारती बुवा , येथे स्मशान भूमि जवळ गुरांसह ११ आरोपीना रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणी सोनाळा पोस्टेमध्ये सरकार तर्फे पोलीस शिपाई राहुल पवार यांच्या फिर्यादीवरून अप नं २९६ / २०१४ कलम न ११ (१) (क) (च) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक वे अधिनियम १९६० नुसार ११ विरुद्ध गुन्हा बा दाखल करण्यात आला आहे. यातील ९ मजूर आरोपी पिंगळाचे तर २ आरोपी अकोला . जिल्हयातील दिनान झरी येथील रहिवाशी आहेत. तर मास्टर माईंड मात्र अजूनही मोकाट असल्याचा आरोप बजरंगी करित आहेत. यातील ४७ बैल गोवंशाची सरकारी किंमत प्रत्येकी १५ हजार असून एकूण किंमत ७ लक्ष ५ हजार एवढी आहे. ४ आय (पुराणे) जप्त करण्यात आल्या. गुरे एकमेकांना क्रुरपणे बांधून पायदळ पहाडी मार्गाने हाकलत आणण्यात येत असल्याचे आढळून आले. देखभालीसाठी ४७ बैल गोवंशांना कृष्णाई गौरक्षण येथे पाठविण्यात आले आहेत. स्थानीक पोलीसांच्या सहकार्यामुळे धाडसी कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे. उपरोक्त प्रकरणी सुशिल वजिर भारसाकळे वय २४ वर्षे बहादुर भिका केदार वय ४५, मनोजमनोहर तायडे २५, अमोल सलाबद केदार २७, शरिफ रहेमान तायडे ३२, अन्वर अब्दुल तायडे ४० प्रताप रामू सिसोदिया ४० राजेश मनोहर तायडे २२, आशिष इब्राहिम घट्टे वय २९ सर्व रा. पिंगळी व अनिल श्रावण महल्ले वय ३०, सत्तार कासम सुरत्त ४३ दोघे रा. दिवाण झरी पो.स्टे. हिवरखेड रूपराव जि. अकोला असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व मजूर असल्याची माहिती आहे. त्या मजूरांना १५० रुपये जोडी प्रमाणे मजूरी मिळते.

सभोवताल वन्यजीव विभागाचा कोअर जंगल असतांना ही तस्करी कशी ? असा सवाल आहे. दरम्यान धुलघाट तलाईमार्गाने वारी धरणाजवळ तेथून मंदिरालगत बायपास रस्त्याने उतरून ही गुरे पिंगळी शिवारातील शेतात मुक्कामी असल्याचे सोनाळा वन्यजीव विभागाचे म्हणणे आहे. वन्यजीव विभागाने पण उपरोक्त कार्यवाही साठी सापळा रचला होता. मात्र त्यावेळेस गुरे आले नाहीत, असे सोनाळा रेंजचे आरएफ ओ सुनिल वाकोडे यांनी सांगितले. बजरंगीच्या धाडसी पुढाकाराने प्रथम अवैध गुरेढोरे तस्करीचा पर्दाफाश झाला आहे.आह यामुळे बजरंगीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील तपास ठाणेदार सपोनि चंद्रकांत पाटील यांच्या नेत्वात पोहेकॉ दिलीप खंडागळे हे करित आहेत. प्रत्येक वेळी बजरंग दलाचे कार्यकर्तेच व सुजाण नागरिक पकडुन देतात मग पोलिस अधिकारी काय करतात असा प्रश्न सामान्य जनते विचारत आहे ह्या कडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129