लाखोंच्या सि. सि टीव्ही कॅमेऱ्याला रिचार्जच नसल्याने रॉबरीच्या घटनेतील चोरटे अद्यापही फरार…आसलगाव ग्रा.पं. चे सि. सि. टीव्ही कॅमेरे बनले शोभेचे वस्तू
MH 28 News Live / जळगाव जामोद : आसलगाव येथे बाजारात येत असलेल्या व्यापाऱ्याला चोरट्यांनी मारहाण करून लुटल्याची घटना मंगळवारी घडली. दरम्यान ज्या भागातून चोरटे पसार झाले त्या ठिकाणी आसलगाव ग्राम पंचायतने लाखो रुपये खर्चुन सिसिटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. मात्र रिचार्ज नसल्यामुळे सदर कॅमेरे बंद असल्याची बाब उघड झाली असून लाखो रुपये खर्चून लावलेले कॅमेरे शोभेची वस्तू बनले असल्याचे दिसून येते. दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्यांमुळे पोलिसांसह ग्राम पंचायत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.
आसलगाव येथे दर मंगळवारी बाजार भरतो. या बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चोरीच्या घटना वाढ होत आहे. मंगळवारी आठवडी बाजाराला येणाऱ्या सोने-चांदी व्यापाऱ्यांकडून फार मोठा ऐवज लुटण्याच्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. आज चार दिवस उलटून सुद्धा पोलिस आरोपीला शोधू शकले नाहीत. घटनास्थळापासून तर नांदुरा रोड पर्यंत ग्रामपंचायत हद्दीत सहा ते सात सिसिटीव्ही कॅमेरे लागलेली आहेत. एका खासगी कॅमेरा मध्ये लुटारूंची छायाचित्र कैद झाले परंतु, ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ग्रामपंचायतने रिचार्ज न केल्यामुळे पळून जाणारे आरोपी हे टिपता आले नाही. लाखो रुपयांचा निधी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगातून खर्च केला. परंतु त्यात रिचार्ज टाकले नसल्याने ते कॅमेरे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. यामध्ये रिचार्ज टाकले असते तर संबंधित व्यापाऱ्याची लाखोंची लूट करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केव्हाचेच ताब्यात घेतले असते.
आता ह्या कॅमेऱ्यामध्ये रिचार्ज करणे म्हणजे साप गेल्यावर भूई थोपवण्यासारखा प्रकार आहे. तसाही आसलगाव ग्रामपंचायतीचा कारभार हा अंदाधुंद सुरू आहे. मोठ्या वस्त्यांमध्ये रस्ते नाहीत आणि फक्त ग्रामपंचायत सदस्याचे एका घरासाठी लाखोंचा रस्ता करण्याचा प्रकार सुद्धा नुकता घडला आहे. या प्रकाराची चौकशी सुद्धा सुरू आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button