
आ. श्वेताताई महाले यांचा उद्या चिखली शहर भाजपाकडून सत्कार
MH 28 News Live : चिखली : विधानसभा निवडणुकीत चिखली मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून सलग दुसऱ्यांदा विजय संपादन केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्वेताताई महाले यांचा भव्य सत्कार चिखली शहर भाजपच्या वतीने दि. २२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या राजमाता जिजाऊ सभागृहात सायंकाळी ४ वाजता हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तरी याप्रसंगी भाजपाचे सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर पुरोहित आणि महिला मोर्चा शहराध्यक्ष नीता जैन यांनी केले आहे.



