ती पाच महिन्याची गर्भवती अल्पवयीन मुलगी अज्ञात युवकाबरोबर मोटरसायकलवरून पळाली
MH 28 Nees Live : पाच महिन्याची गर्भवतीला शासकीय रुग्णालयात उपचार करून परत आणले आणले जात असताना ती रुग्णालयाच्या गेट जवळूनच हाताला झटका देत सदर एका अज्ञात युवकाच्या दुचाकीवर बसून फरार झाल्याची घटना २६ डिसेंबर रोजी बुलढाणा येथे घडली.
पोलिसांकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, बुलडाणा येथील सखी वन स्टॉप येथे कार्यरत महिला सुरक्षा रक्षक ह्यांनी महिला सीए यांच्या आदेशाने सखी वन स्टॉप येथे दाखल असलेल्या 16 वर्षीय पीडित मुलीला पोटात दुखत असल्यामुळे तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले होते.
पिडीत मुलगी ही ५ महिन्याची गर्भवती होती. तिचा उपचार झाल्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडत असताना रुग्णालयाचे गेट जवळ सुरक्षा रक्षक महिल कर्मचारी दुकानातून बिस्किट विकत घेत असताना, पीडितने हाताला झटका देत पळ काढला. ती एका ३२ ते ३५ वर्षीय युवकाच्या दुचाकीवर बसून फरार झाली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम १३७ (२) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button