
खळबळजनक – गांगलगाव येथे २८ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला विहिरीत.
MH 28 News Live, रवींद्र सुरूशे, अंढेरा : पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गांगलगाव ते चिखली रोडवरील अशोक आराख यांच्या शेतात विहिरीत मृतदेह आढळला. अशोक आराख हे मोटर चालू करायला गेले असताना त्यांना विहिरीत प्रेत तरंगताना दिसून आले. या घटनेची माहिती त्यांनी पोलीस पाटील व सरपंच यांना दिली. त्यांनी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. विहिरीत आढळलेले प्रेत हे विजय डोंगरे वय वर्ष 28 गांगलगाव तालुका चिखली येथील असल्याचे निष्पन्न झाले.
अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर यांनी ताबडतोब घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. विहिरीत प्रेत आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. विजय डोंगरे हा आपल्या मित्रांसह कोलारा येथील रामभाऊ बाबांच्या यात्रेला गेला होता. तो ज्यांच्या सोबत गेला त्यांच्यासोबत घरी परत आला नाही. या प्रकरणाविषयी अशोक डोंगरे यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.नेमकं प्रकरण काय घडलं ? सत्य काय ?आत्महत्या की, मित्रासोबत मौज मजा करताना स्वतःच स्वतःच्या जीवाशी खेळ झाला हे गुढ मात्र कायम आहे. या घटनेचा तपास ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button