♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले ” संजय राऊत यांची ‘ती’ प्रतिज्ञा पूर्ण “… शिवसेना उबाठाच्या अवस्थेवर शाब्दिक फटकारे

MH 28 News Live / बुलढाणा : शिवसेना उबाठा पक्षाचे राज्यसभा सदस्य व प्रवक्ते संजय राऊत यांना अलीकडेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत संतप्त शिवसैनिकांनी खोलीमध्ये कोंडून कथीत मारहाण केल्याचे वृत्त मागील दोन-तीन दिवसांपासून प्रसिद्धी माध्यमांवर व समाज माध्यमातून धुमाकूळ  घालत आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांच्या वर्मावर घाव घालणारे शाब्दिक फटकारे लगावले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ( Shivsena ) शिवसेना संपवण्याची ‘मनोमन प्रतिज्ञा’ ( Uddhav Thakery ) उद्धव ठाकरे यांचे खासमखास खासदार ( Sanjay Raut ) संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांनी ही कामगिरी शिवसेना उबाठा पक्ष पार रसातळाला गेला असून संजय राऊत यांनी केलेली ही प्रतिज्ञा पूर्ण करण्यात त्यांना मोठ्या प्रमाणात यश आले, अशा खोचक शब्दात केंद्रीय मंत्री ( Prataprao Jadhav ) प्रतापराव जाधव यांनी राऊत यांच्यावर शरसंधान केले.

ना. प्रतापराव जाधव हे आज ( Buldhana ) बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यलय परिसरातील आपल्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार घेतला. यानंतर त्यांनी उपस्थित निवडक प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींशी अनौपाचारिक संवाद साधला. यावेळी ना. जाधव यांनी विविध राजकीय विषयावर मनमोकळी चर्चा करीत भाष्य केले. दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्याबद्दल विचारणा केली असता त्यांच्यावर काय बोलावे ? असा प्रतिप्रश्न त्यांनी स्मितमुद्रेने केला. त्यांनी मनोमन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपविण्याचा संकल्प नव्हे प्रतिज्ञा केली होती. ठाकरे सेनेची आजवरची कमगिरी, सध्याची स्थिती, बिकट दशा लक्षात घेतली तर ठाकरे सेना संपविण्याची त्यांची प्रतिज्ञा जवळपास पूर्ण झाली आहे, असे प्रतापराव जाधव म्हणाले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129