
घृणास्पद… वासनांध वसतिगृह अधीक्षकाकडून १३ वर्षाच्या मुलाचा लैंगिक छळ; चिखली तालुक्यात संतापजनक प्रकार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
MH 28 News Live / चिखली : ” कामातुरानम् न भयम् न लज्जा ” या संस्कृत ओळीचा अर्थ काम वासनेने अंधळा झालेल्या व्यक्तीला कशाचीच भिती आणि कोणतीही लाज वाटत नसते, असा होतो. याची प्रचिती चिखली तालुक्यातील पेठ येथे परवा उघडकीस आलेल्या घृणास्पद प्रकारातून आली. शासकीय वसतीगृहाच्या अधीक्षकानेच तेथे राहणाऱ्या १३ वर्षाच्या मुलावर शारीरिक अत्याचार करून त्याचा लैंगिक छळ केला. संबंधित वासनांध वसतिगृह अधीक्षकाला अमडपूर पोलीसांनी अटक केली असून त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६८, ११८ (१) व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार थोडक्यात असा घडला की, तालुक्यातील पेठ येथे मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय अनुदान तत्त्वावर वसतिगृह आहे. येथे जालना जिल्ह्यातील एका मजूर कुटुंबातील मुलगा शिक्षण घेण्यासाठी राहात होता. या मुलासोबत अधीक्षक विनायक ( विनोद ) देशमुख ( ५२ ) हा अनैसर्गिक कृत्य करत असल्याची बाब उघडकीस आली. पीडित मुलाचा १ नोव्हेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत अधीक्षकाने लैंगिक छळ केला. ही बाब मुलाने आईला सांगितली. त्याच्या कुटुंबीयांनी अमडापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. ठाणेदार निखिल निर्मळ यांनी ही घटना गांभीर्याने घेत अधीक्षक देशमुख विरुद्ध विविध कलमान्वये गुन्ह्य दाखल केला. आरोपीने अशा पद्धतीचे आणखी काही विकृत गुन्हे केले काय ? या दृष्टीने तपास सुरू आहे.



