ओबीसींसाठी महत्त्वाची बातमी – थकीत कर्जाचा एक रकमी भरणा केल्यास व्याजात मिळणार ५० टक्के सवलत
MH 28 News Live / बुलढाणा : एक रकमी परतावा योजनेंतर्गत महामंडळाच्या लाभार्थीना थकीत कर्जाच्या व्याज दरात ५० टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी एक रकमी परतावा दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत करुन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. मुंबई यांचे जिल्हा कार्यालय बुलढाणामार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत जिल्हयातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयं रोजगाराकरीता अल्प व्याज दराने कर्ज वितरित केले आहे. परंतु काही लाभार्थ्यांकडून कर्ज थकीत असल्याचे निर्देशनात आले आहे. थकीत कर्ज प्रकरणात कर्ज वसुली व्हावी याकरीता संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एक रकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. तरी या एक रक्कमी परतावा योजनेचा लाभ घेऊन सर्व संबंधित लाभार्थ्यांनी थकीत मुद्दल व व्याज रक्कमेचा भरणा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 07262-248285 वर संपर्क करावा.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button