
राज्यातील ITI महाविद्यालयांना मिळणार महापुरुषांची नावे, बुलढाणा जिल्ह्यातील ११ महाविद्यालयांचा समावेश
MH 28 News Live : राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागाने बुधवार, १५ जानेवारी या दिवशी राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI, आयटीआय) नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
या आयटीआय कॉलेजेसला आता महापुरुष, क्रांतीकारक यांची नावे दिली जाणार अहेत. यात सर्वाधिक चंद्रपूर, नांदेड, बुलढाणा, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातील आयटीआय महाविद्यालयांचा समावेश आहे.
या निर्णयांची अंमलबजावणी करण्याबाबत संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले आहेत. त्यामध्ये नव्याने आयटीआय कॉलेजचे नामकरणात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांच्या नावाने (माजलगाव), पद्मविभुषण पांडुरंगशास्त्री आठवले (म्हसळा), परमवीर चक्र विजेता नाईख जादू नाथसिंह (मोहोळ), परमवीर चक्र विजेता लान्स नाईक कदम सिंह (सांगोला), परमवीर चक्र विजेता मेजर सोमनाथ शर्मा (अकलूज), कल्पना चावला (संग्रामपूर), तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (वाई), श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज (दहीवडी) आणि क्रांतीकारी, कृषीभूषण, हुतात्मा, स्वातंत्र्यसौनिक, लोकनेते, आयुर्वेदाचार्य, संत आणि शिक्षण महर्षी यांची नावे आता दिली जाणार आहेत. ३० जिल्ह्यांतील आयटीआय (government industrial training institute) कॉलेजचा या मध्ये समावेश आहे.
राज्यात ४१९ शासकीय आणि ५८५ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. यापैकी १३२ शासकीय संस्थांच्या नावात बदल करण्याच्या प्रस्तावाला ८ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिली होती. मात्र निर्णय झाला नव्हता. बुधवार, १५ जानेवारी या दिवशी राज्यातील ३० जिल्ह्यांतील १३२ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
या जिल्ह्यांतील महाविद्यालयांचे होणार नामकरण
* अकोला ७, अमरावती ०१, कोल्हापूर ०२, गडचिरोली ०७, गोंदिया ०७, चंद्रपूर ०९, छत्रपती संभाजीनगर ०१, जळगाव ०४, जालना ०६, धाराशिव ०२, धुळे ०१, नंदुरबार ०१, नागपूर ०८, नांदेड १०, नाशिक ०२, परभणी ०६, बुलढाणा ११, भंडारा ०५, मुंबई उपनगर ०१, यवतमाळ ०८, रत्नागिरी ०१, रायगड ०३, लातूर ०३, वर्धा ०२, वाशिम ०५, सांगली ०१, सातारा ०२, सोलापूर ०४, हिंगोली ०२
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button