ट्रकच्या धडकेने स्कुटी चालक ठार; चिखली येथील जालना रोडवर झाला अपघात
MH 28 News Live / चिखली : विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे स्कुटी चालकाचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात चिखली शहरालगत असलेल्या खामगाव जालना महामार्गावर रेणुका पेट्रोल पंपाने जी सायंकाळी ७:५० मिनिटांनी झाला.
सायंकाळी पावणेआठच्या सुमारास चिखली तालुक्यातील शिंदी हराळी येथील रहिवासी अविनाश ज्ञानदेव सपकाळ हे मेहकर फाट्याकडून चिखली शहराच्या दिशेने येत होते. याच वेळेस चिखलीकडून जळगावकडे जाणारा ट्रक भरधाव वेगाने आला. या ट्रकची स्कुटी चालक अविनाश सपकाळ यांना जोरदार धडक रेणुका पेट्रोल पंप समोर बसली. या अपघातात स्कुटी चालक अविनाश ज्ञानदेव सपकाळ हे जागीच ठार झाले. वृत्त लिहेपर्यंत या अपघाताची चिखली पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button