♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखलीत मविआला  पडले खिंडार; गाडेकर दांपत्यासह, किशोर सोळंकी, निलेश अंजनकर  व पदाधिकाऱ्यांचा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

MH 28 News Live / चिखली : मतदारसंघात आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराला एक नवा आयाम मिळाला असून विधानसभा निवडणुकीतील सलग दुसऱ्या विजयानंतर आ. महाले यांच्या नेतृत्वाला अधिक लोकमान्यता मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागात महाविकास आघाडी मधील काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शप या पक्षांना मोठे हादरे बसत असून आज दि. २२ जानेवारी रोजी मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शप पक्षाचे प्रदेश सचिव संजय गाडेकर, यांच्या सुविद्य पत्नी व तेल्हारा ग्रामपंचायतच्या सरपंच किरणताई गाडेकर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सोळंकी, काँग्रेस पक्षाचे चिखली शहर कार्याध्यक्ष निलेश अंजनकर, प्रतिथयश व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते पंकज कोठारी यांच्यासह बऱ्याच गावातील आजी – माजी सरपंच व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला.

आपल्या धडाकेबाज विकासकार्यामुळे व पक्ष संघटनेला अधिक मजबूत करण्याच्या कार्यपद्धतीमुळे आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वाला दिवसेंदिवस लोकमान्यतः वाढत आहे. राजकीय क्षेत्रातील विविध पक्षामधील पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने शश्वेताताईंच्य नेतृत्वाकडे आकर्षित होऊन भाजपात प्रवेश करत असल्याचे चित्र मागील चार-पाच वर्षात पाहायला मिळाले. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जनसामान्यात भाजपची लोकप्रियता वाढत असून दोन महिन्यापूर्वी विधानसभा निवडणूक संपन्न झाली. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर श्वेताताईंचा प्रभाव चिखली मतदारसंघात अधिक वाढल्याचे स्पष्ट संकेत आज झालेल्या पक्षप्रवेशातून मिळत आहेत. याचाच परिणाम म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत महाविकास आघाडी मधील काँग्रेस, शिवसेना उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेस श. प. या घटक पक्षांमधील अनेक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपा जाहीर प्रवेश केला या सर्व कार्यकर्त्यांना येणाऱ्या काळात सन्मानाची वागणूक भाजपात मिळेल याची झलक आ. श्वेताताई महाले यांनी आजच दाखवून दिली असे म्हणावे लागेल; कारण या सर्व कार्यकर्त्यांना थेट मुंबई येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या साक्षीने भाजपात प्रवेश मिळवून देत श्वेताताईंनी आपले राजकीय कौशल्य पुन्हा एकवार सिद्ध केले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

यांनी केला भाजपात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव तथा चिखली तालुक्याचे माजी अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक संजय गाडेकर, तेल्हारा ग्रामपंचायतच्या सरपंच व किरणताई संजय गाडेकर, चिखली मतदारसंघाचे युवक काँग्रेस अध्यक्ष किशोर सोळंकी, माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष निलेश अंजनकर, गांगलगावचे माजी सरपंच काँग्रेसचे नेते नितीन म्हस्के, काँग्रेसचे गांगलगाव येथील माजी सरपंच गणेश मस्के, काँग्रेसचे नेते व जगदंबा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव गिर्हे, शिवसेना उबाठाचे वरखेड येथील सरपंच विनोद कणखर, चिखली तालुका युवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष व गोंधणखेडचे माजी सरपंच प्रवीण पाटील, सामाजिक कार्यकर्ते पंकज कोठारी, कारखेडचे माजी सरपंच ज्योती गणेश गायकवाड, ग्रामसेवा सोसायटी कवठळचे अध्यक्ष पंढरीनाथ गावंडे, गांगलगावचे माजी सरपंच समाधान मस्के, सामाजिक कार्यकर्ते गजानन मस्के, युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमोल बांबल आणि युवक काँग्रेसचे नेते नंदू वाघमारे या सर्वांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

भाजपा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील – प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

आज भारतीय जनता पक्षात आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचे रुमाल देऊन पक्षात स्वागत केले. या प्रसंगी बोलताना बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकुशल प्रशासनामुळे देशात व राज्यात परिवर्तन घडत असून परिवर्तनाची ही लाट शहर व ग्रामीण भागात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. चिखली मतदारसंघ सुद्धा याला अपवाद नाही. येथे देखील आ. श्वेताताई महाले यांच्या विकासकार्याचा झंझावात मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने चिखलीमध्ये देखील भाजपचे बळ वाढत आहे. त्याचे प्रत्यंतर आज होत असलेल्या पक्षप्रवेशातून आले. भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहील, त्याला पूर्ण ताकद देईल; या पाठबळाचा उपयोग आपण सुद्धा पक्ष अधिकाधिक वाढवण्यासाठी करावा अशी अपेक्षा यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखवली.

प्रवेशकर्त्यांना योग्य सन्मान व समान संधी मिळेल – आ. श्वेताताई महाले

आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व नव्या सहकाऱ्यांचे मी पक्षात मनःपूर्वक स्वागत करते. यातील प्रत्येक जण हा राजकीय व सामाजिक क्षेत्रात व्यापक अनुभव व जनसंपर्क असलेला कार्यकर्ता आहे याची मला जाणीव आहे. प्रत्येकाला येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षात योग्य तो सन्मान व आपल्यातील कार्यक्षमता दाखवण्याची समान संधी निश्चित मिळेल व यातून भाजपाचा चिखली मतदारसंघात पाया अधिक विस्तारेल अशा शब्दात आ. श्वेताताई महाले यांनी या पक्षप्रवेशाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129