♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

वृध्दाचा निर्घृण खून… शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

MH 28 News Live : लोणार ( राहुल सरदार ) शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील शहरातील दत्त मंदिर जवळ असलेल्या निलेश जैन यांच्याजैन पत्रा डेपोवरील वृद्ध रखवालदाराचा निर्घृण खून झाल्याची घटना १८ फेब्रुवारीला सकाळी उघडकीस आली.

येथील जैन पत्रा डेपोवर बाबा मनसा पवार ( वय ७५ वर्ष ) राहणार देवठाणा तालुका मंठा जिल्हा जालना हे मागील पाच सहा वर्षांपासून ते रखवालदारीचे काम करीत होते. ते लोणार येथे पंधरा वर्षांपासून राहत होते. सदर घटनेची माहिती लोणार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांना मिळताच ते आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले पो. कॉ. नितीन खराडे लेखणीक गणेश लोंढे बिट जमदार संजय जाधव वाहतूक शाखेचे पंढरी गिते मनोज शेजूळ पो. कॉ. राहुल कायंदे चालक प्रवीण शिंदे सह घटनास्थळी पोहचले. या घटनेची माहिती त्यांनी आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटिल यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच बुलडाणा येथून श्वान पथक व ठसे तज्ज्ञ यांना पाचरणं करण्यात आले. यावेळी पंचनामा करत सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालय लोणार येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

पोलीस अधिकारी यांनी योग्य त्यां सूचना दिल्या. सदर पोलीस अधिकाऱ्यांनी सूक्ष्म निरीक्षण करत सदर दुकानाचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता ते बंद आढळून आले. फिर्यादी सुमन अंबादास चव्हाण राहणार लोणार यांचे फिर्यादी वरून अपराध क्रमांक ५७ कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे लेखणीक गणेश लोढे करीत आहेत.

मागील आठ ते दहा दिवसा अगोदर विविध वर्तमानपत्राने लोणार शहराला तिसऱ्या डोळ्याची गरज या मथळ्याखाली ठळक वृत्तांना प्रसिद्धी दिली होती यामध्ये शहराला सीसीटीव्ही कॅमेऱ्याची किती आवश्यकता आहे याबाबत वृत्तांकन केले असतानाही प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही जर वेळीच सीसीटीव्ही कॅमेरे शहरात बसवले तर वाढत्या गुन्हेगारीला निश्चित आळा बसेल त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरा चा प्रश्न हा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129