
कर्जाच्या ओझ्याखाली पिचलेल्या शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या; लोणार तालुक्यातील सोनूना येथील घटना
MH 28 News Live, लोणार : तालुक्यातील सोनूना येथील पांडुरंग संभाजी हाके ह्या ६५ वर्षीय शेतकरी बांधवाने २५ मार्च २०२३ च्या रात्री स्वतःच्या शेतातील गोंधन च्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत.सविस्तर वृत्त असे की लोणार तालुक्यातील सोनूना येथील शेतकरी पांडुरंग हाके वय ६५ वर्ष हे दिनांक २५ मार्च २०२३ रोजी रात्री १० वाजता घरून गेले त्या नंतर काही वेळाने न आल्याने गावातील नागरिकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी त्यांनी पाहणी केली असता ते त्यांच्या स्वतःच्या शेतातील गोंधन च्या झाडाला गळफास घेतलेले नागरिकांना दिसले नागरिकांनी तात्काळ या बाबत लोणार पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. या घटनेचे गांभीर्य बघता लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सूरज काळे पो का नितीन खरडे तेजराव भोकरे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. २६ मार्च २०२३ रोजी लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला. पांडूरंग हाके यांना काही दिवसांपूर्वी थकीत कर्जासाठी बॅंकेची नोटीस आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. यांच्या पश्चात पत्नी २ मुलं आहेत
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज काळे हे करीत आहेत.



