
चिखलीत “कलानाथ क्लिनिक” आणि “कलानाथ औषधालय” चे नव्या ठिकाणी उद्घाटन सोहळा “कलानाथ डेन्टल व जनरल क्लिनिक” व “कलानाथ औषधालय” चे भव्य स्थलांतर सोहळा संपन्न
MH 28 News Live / चिखली चिखली येथे “कलानाथ डेन्टल व जनरल क्लिनिक” तसेच “कलानाथ औषधालय” यांचे स्थलांतर ६ एप्रिल रोजी रामनवमीच्या पावन दिवशी करण्यात आले. या शुभप्रसंगी एक भव्य उद्घाटन सोहळा पार पडला, ज्याचे उद्घाटन चिखली मतदार संघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या शुभहस्ते झाले.
या सोहळ्याला सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोन्द्रे, बुलडाना अर्बनचे प्रमुख राधेश्याम चांडक,अन्न औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त गजानन घिरके शिवसेनेच्या नेत्या जयश्रीताई शेळके, वृषालीताई बोन्द्रे, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील, रमेशचंद्र बाहेती,चिखलीचे माजी नगराध्यक्ष रविंद्रप्रसाद हरलालका, देऊळगावराजाचे माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात रामकृष्ण शेटे, भगवानदास नागवाणी, नंदुभाऊ सवडतकर, निलेश गावंडे, डॉ. विश्वनाथ यादव, पंडित देशमुख, दीपक देशमाने , खुशाल गोलाणी , शैलेश बाहेती , पत्रकार गोपाल तुपकर देशमाने, श्रीराम झोरे, शेख अनिस, डॉ. रामेश्वर दळवी, डॉ. ज्योतीताई खेडेकर, शेखर खोले, विलास घोलप, रविंद्र तोडकर, डॉ. राहुल मेहेत्रे, डॉ. राहुलदेव जाधव, डॉ. सागर खरात, डॉ. स्वप्निल भराड, , जयलिन पटवा यांचा देखील विशेष सहभाग होता. या प्रसंगी बोलताना आमदार श्वेताताई महाले यांनी नवीन ठिकाणी सुरु झालेल्या या आरोग्यसेवा उपक्रमाचे कौतुक करत, नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुरळीत व उत्साही वातावरणात पार पडले. चिखली शहरासाठी ही आरोग्यसेवा केंद्रे एक नवे पर्व ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button