♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मेहकरच्या डॉक्टर दांपत्याला समृद्धी महामार्गावर मारहाण करून लुटले

MH 28 News Live / बुलढाणा : शुक्रवारी रात्री समृद्धी महामार्गावर चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खतरनाक लुटमारची घटना घडली. यामध्ये एका स्कोडा गाडीतून आलेल्या चौघांनी एका डॉक्टर महिलेच्या गाडीला आडवी लावून तिच्या पतीला मारहाण केली आणि त्यांची पत्नी तसेच आई यांची सोन्याची दागिने व मोबाईल घेऊन १२ लाख रुपयांचा ऐवज लुटला.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील डॉ. चैताली श्रावण शिंगणे (३५) आणि पती डॉ. श्रावण शिंगणे हे बोईसर, जि. पालघर येथे आपले क्लिनिक चालवतात. १ मे रोजी डॉ. श्रावण शिंगणे यांच्या मावसभावाच्या लग्नात उपस्थित राहिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी त्यांनी आपल्या कुटुंबासह पालघरला परत जाण्याचा निर्णय घेतला.त्यामध्ये डॉ. चैताली यांची आई मीना निंभोरे आणि त्यांचा मुलगा देखील सामील होते.

शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजता, डॉ. चैताली आणि त्यांच्या कुटुंबीयांची कार सव्वा दहा वाजता करमाड पोलिस ठाण्याच्या हद्दीच्या पुढे आली. त्याचवेळी एका विनानंबर स्कोडा गाडीने त्यांचा पाठलाग सुरू केला. या स्कोडा कारच्या चालकाने अचानक त्यांच्या गाडीच्या समोर येऊन तिला आडवी लावली. त्यानंतर चारजण गाडीबाहेर येऊन आम्ही विमावाले आहोत असे सांगत कारच्या चावी घेतली. त्यांनी डॉ. श्रावण शिंगणे यांना मारहाण केली आणि डॉ. चैताली यांची गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची पोत तसेच डॉ. चैताली यांच्या आईच्या गळ्यातील लक्ष्मीहार, सोन्याली पोत आणि छोट्या पोतसह दोन मोबाईल हिसकावले.

लुटमारीनंतर डॉ. श्रावण शिंगणे यांनी स्कोडा गाडीला पाठीमागून धडक दिली, परंतु चोरट्यांनी गाडी थांबवून पुन्हा डॉ. श्रावण यांना मारहाण केली आणि गाडीची चावी तोडून टाकली. त्यानंतर त्यांनी जिवे मारण्याची धमकी देत गाडी सोडली आणि ते निघून गेले. या धक्कादायक घटनेनंतर चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास करत आहेत

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129