
काँग्रेसचा ‘ तो ‘ नेता आ. डॉ. संजय कुटे यांच्या उपस्थितीत झाला भाजपवासी
MH 28 News Live, जळगाव जामोद : तालुक्यातील सोनाळा येथे गुरुवार १२ मे रोजी पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोदळे यांनी करून कार्यक्रमाचे प्रस्तावित सचिन अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष प्रकाश गोतमारे हे होते. त्याचबरोबर या कार्यक्रमात काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रमोद इंगळे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला असून त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या ध्येय-धोरणावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला. या कार्यक्रमात तालुक्याचे तसेच जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये भाजपा युवा मोर्चा शहर कार्यकारणी गठीत करण्यात आली. भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष पदी गणेश इंगळे, शहर उपाध्यक्ष विक्रांत ढोरे, शहर कोषाध्यक्ष हर्षल राठोड, शहर सह सचिव निलेश तायडे तर टूनकी भाजपा शहर अध्यक्ष पदी मोहन डिगांबर लोणकर यांची निवड करण्यात आली.