
आदर्श विद्यालय व दि चिखली अर्बन विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेत उत्तम कामगिरी
MH 28 News Live / चिखली : येथील आदर्श विद्यालय व दि चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेतील आपल्या उत्कृष्ट परंपरेस यंदाही साजेसा न्याय देत 97.30% निकालाची उज्ज्वल कामगिरी साकारली आहे. परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून, यावर्षी झालेल्या इयत्ता दहावी परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण 408 विद्यार्थी बसले असता त्यातून 397 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पैकी 227 विद्यार्थी प्राविण्यश्रेणीमध्ये आले असून त्यामध्ये 90% पेक्षा जास्त गुण घेणारे एकूण 61 विद्यार्थी आहेत. तर प्रथम श्रेणीत 116 विद्यार्थी , द्वितीय श्रेणीमध्ये 45 तर पास श्रेणीमध्ये 09 विद्यार्थी याप्रमाणे घवघवीत यश संपादन केले आहे.
यावर्षीच्या परीक्षेमध्ये शाळेतून प्रथम येण्याचा मान कु. ईश्वरी विवेक ठेंगझोडे 97.80%, द्वितीय क्रमांक कु. अर्पिता अनंता रोडगे 96.40%, तृतीय क्रमांक कु. नम्रता निलेश माळेकर 96.20% यांनी मिळवला आहे. त्यांच्याकडून शाळेला पुढील वाटचालीसाठीही आश्वासक संकेत मिळाले आहेत.या यशामागे शिक्षण प्रसारक मंडळ चिखली यांची प्रेरणा तसेच विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांचे सखोल मार्गदर्शन, शाळेचे अभ्यासकेंद्रित वातावरण आणि पालकांचे सहकार्य या सर्वांचा समान वाटा असल्याचे शाळेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले त्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे , उपाध्यक्ष नानासाहेब बाहेकर, सचिव प्रेमराज भाला तसेच सर्व संचालक मंडळ यांनी विद्यालयातील सर्व गुणवंत विद्यार्थी व विद्यालयाचे मुख्याध्यापक , सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी बंधू-भगिनी यांचे अभिनंदन केले आहे. मुख्याध्यापक सतीश गव्हले तसेच उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक व सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी बंधू-भगिनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
दि. चिखली अर्बन विद्यानिकेतनच्या दहावीच्या सी.बी.एस.ई. च्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
चिखली शहरातील तसेच पंचक्रोशीतील नावाजलेली अग्रगण्य दि. चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेचा दहावी सी.बी.एस.ई. बोर्डाच्या निकालात उज्ज्वल यश संपादन केले आहे. सी.बी.एस.ई. द्वारे घेतलेल्या परीक्षेमध्ये शाळेच्या एकूण ७६ विद्यार्थांनी परीक्षा दिली होती यात शाळेचे विद्यार्थी उत्तम रीतीने उत्तीर्ण झाले असून यामधून विद्यालयातून अनिकेत मोहन भराड हा विद्यार्थी ९६.४० टक्के गुण प्राप्त करून प्रथम आला आहे. तसेच ९५.८० टक्के गुण घेऊन राहुल राजेंद्र कतोरे यांनी विद्यालयातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे, तर ९५.२० टक्के घेऊन सिद्धी बालाजी जितकर ही विद्यार्थिनी विद्यालयातून तृतीय आली आहे. विद्यालयातून ९० टक्केच्या वर गुण मिळवणारे १५ विद्यार्थी असून अनिकेत मोहन भराड ९६.४०%, राहुल राजेंद्र कतोरे ९५.८०%, सिद्धी बालाजी जितकर ९५.२०%, स्वरा अमोल खेकाळे ९५.००%, गौरव पुरुषोत्तम इंगळे ९५.००%, आदित्य प्रल्हाद बहुले ९४.८०%, पार्थ राजू वायाळ ९४.२०%, कल्याणी संदीप घोडके ९३.६०%, भक्ती बद्रीप्रसाद औटी ९३.२०%, धनश्री गजानन सूर्यवंशी ९२.००%, प्रज्योत प्रशांत वायाळ ९२.००%, अभय सुनील पानगोळे ९१.४०%, रघुवीर आनंद सकळकळे ९१.२०%, कल्याणी रोहिदास जाधव ९०.४०%, तेजस नंदकिशोर कंकाळ ९०.२०% यांनी यश प्राप्त केले आहे.
सी.बी.एस.ई. द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत शाळेचे एकूण ७६ विद्यार्थी बसले होते, यापैकी १५ विद्यार्थी म्हणजेच १९.८०% विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण प्राप्त करून उज्वल यश प्राप्त केले आहे. यापैकी ४४ विद्यार्थी म्हणजेच ५७.८९% विद्यार्थी ८०% पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी ५७ विद्यार्थी म्हणजेच ७५% विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या पैकी ७२ विद्यार्थी म्हणजेच ९४.८०% विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत.
संस्थेचे अध्यक्ष श्री. सतीश गुप्त उपाध्यक्ष श्री.मनोहर खडके, सचिव डॉ.आशुतोष गुप्ता, सहसचिव श्री. पुरुषोत्तम दिवटे, शाळेच्या शैक्षणिक संचालिका डॉ. सौ. पूजा गुप्ता, शाळेचे प्राचार्य श्री.गौरव शेटे सर तसेच सर्व संचालक मंडळाने उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे, पालकांचे व शिक्षक वृंदाचे अभिनंदन केले आहे.
अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या दि. चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेत तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद शैक्षणिक विकासासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देऊन कला, क्रीडा, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण, सांस्कृतिक इत्यादी विविध क्षेत्रातील कार्यक्रम, उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्याकडे विशेष लक्ष देते हे या ठिकाणी उल्लेखनीय असून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शाळा सातत्याने कटिबद्ध असते. परिसरातील नागरिकांकडून शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या उज्वल यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.