♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखलीत गळफास लावून 23 वर्षीय युवकाची आत्महत्या; कारण गुलदस्त्यात; परिसरात शोककळा

MH 28 News Live / चिखली : शहरातील सैलानी नगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या एक धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. नवाब शाह हारून शाह (वय 23) या युवकाने चव्हाण पेट्रोल पंपाजवळील एका ठिकाणी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवाब शाह हा मूळचा सैलानी नगर, चिखली येथील रहिवासी होता. रोजच्याप्रमाणे गुरुवारी रात्री तो घरातून बाहेर पडला, मात्र बराच वेळ झाला तरी परत न आल्याने नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. अखेर बुलढाणा रोडवरील चव्हाण पेट्रोल पंपाजवळ त्याचा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना पाहताच नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले.

पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी पंचनामा केला व मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे पोस्टमार्टेमसाठी हलवण्यात आला. या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात असून, पोलीस याप्रकरणी सखोल तपास करीत आहेत.

 

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
या अनपेक्षित घटनेमुळे नवाब शाहच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील लोकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. नवाब हा शांत स्वभावाचा, मनमिळावू युवक असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर कोणतेही सुसाइड नोट सापडले नसल्याने अधिकृत माहिती पोलिस तपासानंतरच समोर येईल.

पोलीस तपास सुरू

सदर प्रकरणाचा तपास चिखली पोलीस स्टेशनचे अधिकारी करत असून, नवाब शाहच्या मोबाईलमधील माहिती, घरच्यांकडून मिळालेल्या निवेदनांची तपासणी तसेच CCTV फुटेजची पाहणी केली जात आहे. पोलीस निरीक्षकांनी याबाबत लवकरच खुलासा केला जाईल, असे सांगितले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129