♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बॅटऱ्यांच्या चोरीचा पर्दाफाश: २४ तासांत चोरटे जेरबंद, जळगाव जामोदमध्ये बोलेरोसह मोठा मुद्देमाल जप्त

MH 28 News Live / जळगाव जामोद : बंद दुकानाचे शटर वाकवून बॅटऱ्या लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे अटक केली आहे.

अटक झालेले आरोपी

अजमदउल्ला अमानतउल्ला खान (रा. पिंपळगाव राजा, ता. खामगाव)

सैय्यद दानिश सैय्यद ईसमाईल (रा. घोडेगाव, ता. तेल्हारा, जि. अकोला)

चोरी जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरातील चौधरी बॅटरी ट्रेडिंग दुकानात झाली होती. अटक झालेल्या आरोपींकडून तब्बल ३१ हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या आणि ६ लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन हस्तगत करण्यात आले आहे.

शाबासकीची थाप मिळवलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी

पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकातील पीएसआय राहुल तायडे, चंद्रकांत धनके, एएसआय दत्तात्रय बडगुजर, पो. ना. प्रदीप चौधरी, पो. का. सिध्देश्वर डापकर, रतन गिते, योगेश बारी यांच्या कौशल्याने ही कारवाई यशस्वी झाली.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129