♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून सुरतच्या तरुणीवर जळगावमधील हॉटेलमध्ये अत्याचार; आरोपी निघाला मेहकर तालुक्यातला

MH 28 News Live : लग्नाचं आमिष दाखवून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाच एका संतापजनक घटनेनं पुन्हा एकदा समाज हादरला आहे. सुरत येथे नोकरी करणाऱ्या ३५ वर्षीय तरुणीला जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील विनोद शिवराम कुसळकर (वय ३५) याने लग्नाचे आमिष दाखवून जळगाव शहरातील रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये नेलं. तेथे तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, १८ मे रोजी दुपारी साडेचार ते साडेपाच वाजेदरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी पीडितेने १ जून रोजी रात्री तक्रार दाखल केली असून, जळगाव शहर पोलीस ठाण्यात विनोद कुसळकर याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे, तर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129