
महाराष्ट्रात 7 ते 18 जूनदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा; शेतकऱ्यांसाठी पेरणीसाठी अनुकूल वातावरण
MH 28 News Live : राज्यातील काही भागांमध्ये मागील काही दिवसांत पावसाचा जोर कमी झाला असला, तरी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 7 ते 18 जूनदरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
डख यांच्या अंदाजानुसार, 7 ते 10 जूनदरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी शेतीची कामे पूर्ण करून ठेवावीत, कारण 13 ते 18 जूनदरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी वडे, नाले वाहण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
13 जून ते 18 जूनदरम्यान मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर, अहमदनगर, लातूर, नांदेड, बीड, धाराशीव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
राज्यात आतापर्यंत 350 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जमिनीत पुरेशी ओलावा आहे. यामुळे जूनच्या शेवटपर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. डख यांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी अनुकूल वातावरण असल्याचे सांगितले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून महिन्यात महाराष्ट्रात सरासरी 15 ते 22 दिवस पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
महाराष्ट्राला यंदा पाऊस झोडपणार; सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात कोसळणार? असा आहे हवामान अंदाज
जून महिन्यात कसं असेल वातावरण? कोणत्या भागात पडणार मुसळधार पाऊस? पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज
शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार आपली शेतीची कामे नियोजित करावीत आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी. पावसाच्या या कालावधीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button