♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बेपत्ता युवकाची पोलिसांत नोंद; साखरखेर्डा सूतगिरणी परिसरातील घटना

MH 28 News Live / साखरखेर्डा : येथील सूतगिरणी परिसरातून प्रमोद अंबादास मोरे (वय २८) हा युवक दि. १४ जून रोजी अचानक बेपत्ता झाला असून, याबाबतची तक्रार नातेवाईकांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. १४ जून रोजी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास प्राप्त झाली. प्रमोद मोरे याचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने कुटुंबीय चिंतेत असून, बेपत्ता झाल्याची नोंद करून पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची प्रक्रिया तसेच नागरिकांकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. साखरखेर्डा पोलीसांनी नागरिकांना या प्रकरणाबाबत काही माहिती असल्यास तत्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129