♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आरोग्याची भेट… आ. मनोज कायंदेंच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर

MH 28 News Live / चिखली : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अंचरवाडी येथे २३ जून रोजी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध क्षेत्रातील नामवंत डॉक्टर्स नागरिकांची आरोग्य तपासणी करून मोफत वैद्यकीय सेवा देणार आहेत.

या आरोग्य शिबिरात खालील डॉक्टर सहभागी होणार आहेत

डॉ. विशाल सावळे (एम.डी. मेडिसिन) – सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी

डॉ. पवन राऊत – अस्थिरोग तज्ज्ञ

डॉ. अतुल पवार – स्त्रीरोग तज्ज्ञ

डॉ. आखाडे – बालरोग तज्ज्ञ

डॉ. बंगाळे – नेत्ररोग तज्ज्ञ

डॉ. योगिता महाडिक – दंतरोग तज्ज्ञ

शिबिरात रुग्णांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संतोष परिहार, संतोष आटोळे, शेख आसिफ भाई, तालुका युवा अध्यक्ष रुपेश रिंढे आणि आनंथा वायसे यांनी केले आहे.

हा आरोग्य उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित नसून, नागरिकांच्या आरोग्य जपणारी सामाजिक बांधिलकीची एक प्रेरणादायक पायरी ठरणार आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129