♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लोणारमध्ये चोरट्यांचा थरार; सिनेस्टाईल पाठलागानंतर ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

MH 28 News Live / लोणार : शहरात कुशल मेडिकल आणि किराणा दुकान फोडून मोठ्या चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांची पोलिसांनी थरारक पाठलागानंतर धरपकड केली. या प्रकरणात पोलिसांनी तिघा चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही चोरट्यांची टोळी चोरीसाठी मारुती इर्टिगा गाडीचा वापर करत होती. त्यांच्याकडे कटर, कटावण्या, तलवार, चाकू, हातोडा अशा घातक साहित्यांचा साठा सापडला आहे. चोरीची योजना अंमलात आणताना पोलिसांच्या गस्तीदरम्यान संशयित गाडी पोलिसांच्या नजरेस पडली. तत्काळ पाठलाग सुरू केला असता वाहनाचा टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला आदळली. या संधीचा फायदा घेत आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.

या यशस्वी कारवाईमुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे. लोणार पोलीस ठाण्याच्या पथकाने दाखवलेली तत्परता व दक्षता कौतुकास्पद आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129