♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सेवानिवृत्तीच्या तोंडावर लाचखोरीचा कलंक ! सिंदखेड राजामध्ये तलाठी आणि महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

MH 28 News Live / सिंदखेड राजा : सेवानिवृत्तीच्या केवळ एका महिन्याच्या अंतरावर असलेला तलाठी आणि त्याच्यासोबतचा महसूल सहाय्यक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. वर्ग दोनची जमीन वर्ग एकमध्ये रूपांतर करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून ७ हजार रुपयांची लाच घेताना या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) बुलढाणा पथकाने ही कारवाई केली असून, आरोपी तलाठ्याचे नाव रावसाहेब काकडे आणि महसूल सहाय्यकाचे नाव मनोज झिने असे आहे. शेतकऱ्याची तक्रार मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.

 

विशेष म्हणजे, तलाठी काकडे हे अवघ्या एका महिन्यानंतर शासकीय सेवेतील कार्यकाळ पूर्ण करत सेवानिवृत्त होणार होते. मात्र लाच घेतल्यामुळे आता त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे त्यांचे निवृत्तिवेतन, भविष्य निर्वाह निधी तसेच इतर सेवा लाभ मिळण्यावर गंड बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ही कारवाई शेतकऱ्यांमध्ये आणि महसूल विभागात मोठी खळबळ उडवणारी ठरली आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात एसीबीचे पथक कार्यरत असून, अशा लाचखोरांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही या कारवाईतून मिळाले आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129