
अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू
MH 28 News Live, सिंदखेड राजा : तालुक्यातील साखरखेर्डा पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तांदुळवाडी येथील एका 22 वर्षीय युवकाचा 24 एप्रिलला सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
17 एप्रिल रोजी देऊळगाव माळी नजीकच्या सुभानपूर येथे तांदुळवाडी येथील नामदेव राऊत यांच्या मुलाचे लग्न होते लग्नानंतर सोपान मदन बुंधे 22 हा आपल्या मित्रासह दुचाकीवर घराकडे जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने सोपान हा तडफडत असताना त्याला उपचारार्थ मेहेकर नंतर औरंगाबाद येथे हलविण्यात आले. आत दिवस मृत्यूशी झुंज देत असताना आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. सोपानचे वडील हे रापममध्ये चालक म्हणून नोकरीला आहे. सोपानच्या मृत्यूने गांवात हळहळ व्यक्त होत आहे.