
डोंगरखंडाळ्यात मायलेकीला मारहाण; चार महिलांवर गुन्हा दाखल
MH 28 News Live / डोंगरखंडाळा : कौटुंबिक आर्थिक वादाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथे मायलेकीवर नात्यातीलच चार महिलांनी लाकडी दांड्याने जबर मारहाण केल्याची घटना ६ जुलै रोजी घडली.
या प्रकरणाचा व्हिडिओ सायंकाळी समाजमाध्यमावर व्हायरल झाला असून, याप्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात विमल धांडेकर, कमल धांडेकर, सुमन चव्हाण आणि दीपाली मंजूळकर या चौघींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ज्योती गजानन जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी महिलांनी ज्योती आणि त्यांची आई मीरा गजानन जाधव यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.