
साखरखेर्ड्यात कारचा थरार… चार जखमी, एकाची प्रकृती गंभीर
MH 28 News Live / साखरखेर्डा : येथील बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची मोठी वर्दळ असते. दि. ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता लव्हाळा येथून आलेल्या भरधाव अल्टो कारने बसस्थानकावर उभ्या असलेल्या मोटारसायकलींना जोरदार धडक दिली. या अपघातात चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सर्व जखमी व्यक्ती सांवगिवीर येथील असल्याची माहिती आहे. किरकोळ जखमी झालेल्या काहींनी खाजगी रुग्णालयात उपचार करून घेतले, तर गंभीर जखमी व्यक्तीला प्रथम साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे पाठविण्यात आले.