♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बनावट रुग्ण, बनावट आजार… आणि सरकारी योजनांची लूट !…गोरगरिबांच्या नावावर लाखोंचा खेळ ! बुलढाण्यात आरोग्य योजनेतील घोटाळा उघड

MH 28 News Live / बुलढाणा : शहरातील ‘ बुलढाणा मल्टी स्पेशालिटी हॉस्पमधील ‘ मधील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून लाखो रुपये काढण्यासाठी बनावट रुग्ण उभे करण्यात आले, आणि बनावट आजारांचे रिपोर्ट तयार करून सरकारची फसवणूक करण्यात आली. ही माहिती माध्यमांमार्फत समोर आली आणि एकप्रकारे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

कागदोपत्री उपचार; प्रत्यक्षात काहीच नाही

या कथित रुग्णालयाने अनेक रुग्ण दाखवले जे प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हते. बनावट डॉक्युमेंट्स, बनावट मेडिकल रिपोर्ट्स आणि शस्त्रक्रियेच्या खोट्या नोंदी यांच्या आधारावर लाखोंचा अपहार करण्यात आला. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार गोरगरीब रुग्णांकरिता असलेल्या योजनेच्या नावावर घडत होते.

जिल्हा शल्य चिकित्सकांनी उघड केला प्रकार

डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “महात्मा फुले योजनेअंतर्गत दाखवले गेलेले रुग्ण आणि त्यांच्या शस्त्रक्रिया हे सर्व संशयास्पद असून, चौकशीत खोटेपणा उघड झाला आहे.”

गरिबांचा आधारच बनला फसवणुकीचे हत्यार

ही योजना समाजातील गरीब आणि वंचित घटकांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आहे. मात्र, जे डॉक्टर्स आणि रुग्णालयं रुग्णांचे जीव वाचवायला हवे, तेच पैसे उकळण्याच्या स्पर्धेत उतरल्याचं दिसत आहे. रुग्णालयांनी हे पैसे प्रत्यक्ष उपचार न करता घेणे, हे केवळ आर्थिकच नव्हे तर नैतिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.

दोषींवर कारवाई अटळ

आरोग्य विभागाने या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दोषींवर कठोर कारवाई होणार असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी यंत्रणेला अधिक कडक बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

नागरिकांचे प्रबोधन गरजेचे

हा प्रकार सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठा धडा आहे. रुग्णालयात दाखल होताना प्रत्येक कागदपत्र काळजीपूर्वक वाचणे, चुकीच्या गोष्टी निदर्शनास आल्यास त्वरित तक्रार करणे गरजेचे आहे. योजनांचा लाभ खऱ्या रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी नागरिकांनी सजग आणि जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. अशा संवेदनशून्य डॉक्टरांमुळे संपूर्ण वैद्यकीय व्यवसायाची प्रतिमा डागाळली जाते. प्रशासनाने ही साखळी वेळेत तोडली नाही, तर भविष्यात गोरगरिबांना उपचारासाठी दारोदारी फिरावं लागेल, आणि त्यांची आशा ‘बनावट’ यंत्रणेत हरवून जाईल.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129