
चिखली अर्बन बँकेच्या अंबड शाखेत मृतकाच्या वारसदारास धनादेशाचे वितरण
MH 28 News Live, चिखली : अंबड शाखेचे खातेदार दत्ता किसन गिराम यांचे मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अपघाती निधन झाले होते . मयत खातेदाराच्या पत्नी श्रीमती रंजना दत्ता गिराम यांना बँकेचे अध्यक्ष मा . सतीशजी गुप्त यांच्या हस्ते रु २,००,०००/ – रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. सदर धनादेश वितरण कार्यक्रम 25 एप्रिल रोजी अंबड शाखेत अध्यक्ष सतीश गुप्त यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी बँकेचे संचालक सुनीताताई भालेराव, डॉ. राजेंद्र भाला, द्वारकदास जाधव, श्री. सतिश झंवर, शाखाधिकारी यदुनाथ जपे, जगनाथ मुळे, व्यंकटेश गोसावी, दीपक इंगळे, कैलास सोळंकी, संकेत देशमुख, वीरेंद्र भिवाळे, राजेंद्र सावंत यांसह प्रतिष्ठित व्यापारी , खातेदार व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य बॅक म्हणून ओळखल्या जात असलेल्या चिखली अर्बन बॅककडुन खातेदारांना, नागरीकांना कर्ज देण्यासोबतच खातेदारांच्या हितासाठी त्यांचा अपघाती विमा काढला जातो. सदैव सामाजीक बांधीलकी जोपासणारी बॅक म्हणून ओळखल्या जात असलेल्या दि चिखली अर्बन को ऑप बँकेच्या माध्यमातून बचत खाते धारकाच्या व बचत खात्यात एक हजार रुपये असल्यास त्या बचत खाते धारकाचे अपघाती निधन झाल्यास त्याच्या वारसदारास दोन लाख रुपयांचा धनादेश दिला जातो. कुटुंबातील कमविता माणूस अचानक असा अपघातानंतर दगावल्याने त्या कुटुंबासमोर फार मोठे आर्थिक संकट उभे राहते व कधी कधी ते संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडते. आपल्या बँकेच्या खातेदारांना मदत मिळावी, आधार मिळावा या उद्देशाने बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी बँकेच्या सर्व प्रकारच्या खातेदारांना विमा संरक्षण प्राप्त करून दिले आहे.