♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अवैध सावकाराचा झाला खेळ खल्लास…! मोताळा तालुक्यात मोठी कारवाई; कोरे चेक, शपथपत्र, पाच मोबाईल जप्त जयपूरमध्ये सावकाराच्या घरावर छापा

MH 28 News Live / मोताळा : तालुक्यातील जयपूर गावात अवैध सावकाराच्या घरावर सहकार विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात धाड टाकली. संदीप विनायक देशमुख यांच्या राहत्या घरी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान पथकाला अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या.

कोरे शपथपत्र (बॉण्ड), सही केलेले ६१ कोरे धनादेश, सावकारी व्यवहाराची खास वही आणि पाच मोबाईल जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, देशमुख हे पाच मोबाईल्सबाबत कोणताही समाधानकारक खुलासा करू शकले नाहीत. त्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या मोबाईल्ससह संपूर्ण दस्तऐवज अधिक तपासासाठी ताब्यात घेण्यात आले.

सविस्तर तपासणीने सावकारीचे जाळे उघड

ही कारवाई जिल्हाधिकारी किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे व जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांच्या आदेशावरून झाली. जी. जे. आमले (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था मोताळा) यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धाडसत्र पार पाडले.

छाप्यामध्ये अडचणीच्या दस्तऐवजांमध्ये

कोरे बॉण्ड,

विविध बँकांचे सही केलेले कोरे चेक,

एक खास वही (ज्यात सावकारी व्यवहारांची नोंद होती),

तसेच पाच वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल सापडले.

या वस्तूंमधून अवैध सावकारीचं जाळं कसं विस्तारलं गेलं, याचा अंदाज लावता येतो

या कारवाईनंतर मोताळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. नागरिकांवर उच्च व्याजाने कर्ज देऊन त्यांची पिळवणूक करणाऱ्या सावकारांवर आता कायद्याचा चाबूक ओढला जातोय. महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम, २०१४ अंतर्गत कलम १६ अन्वये ही कारवाई करण्यात आली.

सहाय्यक निबंधक जी. जे. आमले यांनी स्पष्ट केले की, अवैध सावकारांविरोधात सबळ पुराव्यासह तक्रारी प्राप्त झाल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल. यासाठी जिल्हा निबंधक (सावकारी), बुलढाणा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.

पथक व यंत्रणांचा संयुक्त सहभाग

या धाडीत सहभागी पथकात यु. के. सुरडकर, एस. के. घाटे, वाय. एम. घुसळकर, आर. ए. डहाके, एन. एस. सोनवणे, पी. व्ही. किकराळे यांचा समावेश होता. तसेच पंच म्हणून तहसीलचे मंडळ अधिकारी सदानंद हिवाळे आणि महसूल अधिकारी गोपालसिंह राजपूत सहभागी होते. पोलीस बंदोबस्तासाठी मोहिनी हावरे आणि रामप्रसाद डोळे यांनी जबाबदारी पार पाडली.

हा छापा म्हणजे सावकारीच्या सावटाखाली असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दिलासा आहे. या कारवाईनंतर अन्य सावकारांमध्येही भीतीचं वातावरण पसरल्याचं बोललं जात आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129