♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान वन व पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला; २६ जणांवर गुन्हा दाखल, सहा अटकेत

  • MH 28 News Live / मोताळा : तालुक्यातील माळेगाव येथील वनजमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईसाठी गेलेल्या वनविभाग व पोलिसांच्या पथकावर झालेल्या हल्ल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात तब्बल २६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही घटना २३ जुलै रोजी घडली. या दिवशी माळेगाव येथील शासकीय वनजमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी वनविभागाचे सात अधिकारी व कर्मचारी, वनमजूर आणि १०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिक्रमणधारकांना दुपारी ३ वाजेपर्यंत अतिक्रमण स्वयंहून हटवण्याची वेळ देण्यात आली होती.

मात्र, कारवाईला सुरूवात होताच काही जणांनी एकत्र येत अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर जोरदार हल्ला चढवला. यामध्ये काही अधिकारी व कर्मचारी किरकोळ जखमी झाले. हल्लेखोरांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करीत कायद्याचा उल्लंघन केला. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, दंगल घडविणे अशा विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, माळेगाव परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सतर्कता बाळगली जात आहे. वनविभागानेही अशा अतिक्रमणांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129